Monday, 17 February 2014

महायज्ञ आणि मेजवानी

आजच्या युगात गोष्टी चांगल्या की वाईट याची पडताळणी करायला कुणालाच वेळ नाही.
अन विचार करायला कुणालाच वेळ नसल्यामुळे समाज जे म्हणेल ते करायचं असं ठरवून मोकळं होतात लोक. .
थोडक्यात आपण विचार करने बंद करायचं आणि आपला मेंदू समाजाला चालवायला द्यायचा.
आता एखाद्या धर्मिक कामाला केलेला खर्च म्हणजे आपल्या हातून एखादे महान पुण्य कर्म झाले असा समज (की गैरसमज )आपण करून घेतो॰
देवळात टाळांचा गजर करून आपण भजन ,कीर्तन करतो. तुकाराम ,एकनाथ ,पुंडलिक अशा महापूरुषांचे महात्मे आपण ओरडून जगाला सांगतो....आता कुठल्या महान भक्ताने देवाला प्रसन्न करण्यासाठी महायज्ञ केला आहे किंवा सत्यांनारायण घातला आहे???
अशी ऐकीव माहिती तरि मिळेल का?
आपल्या श्रदधास्थांनाची डागडुजी करने हे आपलं कर्तव्य आहे .त्यांना आपण जतन केलच पाहिजे. ती आपली संस्कृती आहे आणि मंदीर हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. ते अद्ययावत ठेवणे म्हणजे आपली संस्कृती जीवंत ठेवणे होय. पण हे सगळं करण्यासाठी होम हवन करून कर्मकांडाचं स्थोम माजवणे कितपत योग्य आहे.
आपण अन्नदानाची व्याख्या पण विसरलोय.

समाजात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणार्‍या व्यक्तींना आपण 2 घास खाऊ घातले तर ते अन्नदान होईल. पण आपण एखाद्या सधन व्यक्तिला जेवण दिले तर ती मेजवानी (दावत) झाली . आताच्या मॉडर्न जमान्यात आपण त्याला
पार्टी पण म्हणू शकतो.
धार्मिक कार्यक्रमांच्या नावावर आपण आपल्याच लोकांसाठी मेजवानी चे बेत आखतो आणि अन्नदान हे पवित्र नाव देवून पुण्याकर्माचा आव आणतो.

(वरील मजकूर हे माझे व्यैयक्तिक मत आहे तरी कृपया त्याचा विपर्यास करू नका  )

                                                                      झेंब्या तावडे